Mon, May 20, 2019 18:37होमपेज › Marathwada › प्रवासी स्थानके गावापासून दूर 

प्रवासी स्थानके गावापासून दूर 

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:32PMगेवराई : विनोद नरसाळे

तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वरती बसवलेले प्रवाशी विश्रांती स्थानक प्रवाश्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. गावाच्या फाट्यापासून अर्धा किलोमीटर लांब अंतरावर ही प्रवाशी विश्रांती स्थानके असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशी बसत नाहीत. त्यामुळे ही स्थानके शोभेची वस्तू बनली आहेत.

तालुक्यातील तांदळा, कोळगाव, सावरगाव, सिरसमार्ग फाटा, मादळमोही, पाडळसींगी, गढी, अर्धामसला, सिरसदेवी, जातेगांव फाटा, तालखेड फाटा अशा अनेक ठिकाणी ऊन व पासून या पासून बचाव व्हावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चे डांबरीकरनाचे काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानक तयार करण्यात आले, परंतु ज्या फाट्यावर लोक जेथे जास्तीत जास्त प्रवाशी थांबतात त्याठिकाणापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर ही बसस्थानके असल्यामुळे त्याठिकाणी प्रवाशी जात ही नाहीत व वाहनेही थांबत नाहीत, मग या स्थानकासाठी एवढा खर्च कशासाठी.

प्रत्येक ठिकाणी दर्जेदार पत्रे, लोखंडी पाईप, बसण्यासाठी खुर्च्या व या स्थानकसमोर डांबरी रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहे. प्रवाशी या ठिकाणी फिरकतही नसल्याचे दिसत आहे. ही प्रवाशी विश्रांती स्थानके प्रवाशांच्याच प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहेत.