लोहा : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात रसत्याचे जाळे नितीन गडकरी यांच्या मर्गदर्शनाखाली तयार केले जात आहेत. तसेच 2019 पर्यंत सर्वांना पंतप्रधान योजनेतुन हक्काचे घर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथे केले.
लोहा येथे तीन राष्ट्रीय महामार्गांचा एतिहासिक भूमीपुजम सोहळा गुरूवार ता 19 रोजी लोहा येथे पार पडला. त्यामधे तीन राष्ट्रीय महामार्ग क्रं 1) 361-चाकुर-माळेगाव ,लोहा -वारंगा, 2)राष्ट्रीय महामार्ग 50 नांदेड -उस्मान नगर -कंधार -फुलवळ -ऊदगीर, 3) 161(अ) नांदेड -उस्मान नगर -हाळदा -कोठा-मुखेड-बीदर या महार्गांचे भुमि पुजन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,कामगार मंत्री संभाजी निलंगेकर,रावसाहेब दानवे,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,खा सुनील गायकवाड,आ तुषार राठोड़,विनायक पाटील,मा खा भास्करराव पाटिल खतगावकर,मा आ ओमप्रकाश पोकरणा,गणेश हाके,राम पाटील रातोळीकार यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला हजेरी होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले गेल्या सदुसष्ठ वर्षात 5 कि मी चे रस्ते होऊ शकले नाहीत .परंतू या तीन वर्षात 15 हजार किलो मीटर पर्यंतची रस्ते आमच्या काळात करण्याज आले. लातूर येथे रेल्वे कारखाना उभारला गेला. पंचवीस वर्षां पासून रेल्वेची रखडलेल्या कामांना मंजूरी देण्यात आली असून आता सर्वाना हाक्काचे घर मिळून घेण्यासाठी जेवढ्या घरांची नोंदणी केली जाईल तेवढी घर प्रत्येक धर्मियाना मिळणार असल्याचे मत मुख्यमंत्री यांनी मांडले. या भुमिपुजन कार्यक्रमाला आनेक मान्यवर उपस्थित होते.
विकासाचा विचार झाला पाहिजे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जर जणसामांन्यांचा विकास करायचा असेल तर त्यासाठी आधी त्या भागात वीज ,रस्ते,पाणी ,यांचे जाळे निर्माण झाले तरचं त्या ठिकाणी उधोग निर्माण होउन रोजगार मिळेल .यासाठी फुले,शाहु ,छत्रपतीचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन पुढे गेल्यास गरीबी दूर होईल व बेरोजगाराला रोजगार मिळेल व गरीबी नक्कीच दूर होईल. जर महाराष्ट्राचा सर्वांगीन विकास करायचा असेल तर विकासाचा विचार झाला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोहा येथे केले.