होमपेज › Marathwada › तरुणांकडून हरणास जीवदान 

तरुणांकडून हरणास जीवदान 

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:14AMगेवराई : प्रतिनिधी

मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून हरणाच्या पाडसास गंभीर जखमी केले होते. कुत्रे पाडसाचा फडशा पाडणार तोच गेवराई येथील तरुणांनी कुत्र्यांना हाकालून लावत पाडसास ताब्यात घेतले. या जखमी  पाडसावर नंतर उपचार करण्यात आले. यामुळे   पाडसासा जीवदान मिळाले आहे. 

गेवराईसह परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये हरणांची संख्या वाढली आहे. गेवराई शहराजवळ जातेगाव रोडलगत मोकळी जागा आहे. शिवाय गेवराई शहराच्या एका बाजूस डोंगर असून बाजुलाच तळे आहे. त्यामुळे या परिसरात हरणांची संख्या मोठी आहे. गेवराई शहराजवळील बाळासाहेब पिसाळ यांच्या जिनिंगमागे शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी या पाडसावर हल्ला चढविला होता. कुत्र्यांनी  पाडसाला घेरल्याचे मनोहर पिसाळ,  विकास पवार, पिनू गायकवाड, अश्विन काळे यांनी पाहिले. त्यांनी पाडसास ताब्यात घेऊन वन अधिकारी कांबळे, गाडेकर यांच्याशी संपर्क केला. या पाडसावर डॉ. इब्राहिम शेख यांनी उपचार केले. यामुळे हरणास जीवदान मिळाले.