Wed, Jan 16, 2019 19:39होमपेज › Marathwada › लिंबादेवी फाटयावर रास्ता रोको तर पाटोदयातही आंदोलकांचा ठिया  

मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला !

Published On: Jul 22 2018 2:08PM | Last Updated: Jul 22 2018 2:08PMपाटोदा :  महेश बेदरे

सध्या सर्वत्र मराठा आरक्षण वणव्याची पेटलेली धग पाटोदा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही कायम  आहे. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने रविवारी सकाळी दहा वाजता लिंबादेवी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे नगर - बीड रस्त्यावर वाहतुक ठप्प झाली होती , या वेळी तहसिलदार रुपा चित्रक व पोलिस निरीक्षक एस. जे . माने यांना निवेदन देण्यात आले.

अर्धनग्न आंदोलन सुरुच
परळी येथुन सुरु झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठींबा म्हणुन पाटोदा येथील तहसिल कार्यालय परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही ठिय्या‍ आंदोलन सुरूच असुन आंदोलक आक्रमक आहेत, आज युवकांनी अर्धनग्न आंदोलन सुरु केले आहे.   ठोस निर्णय, झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा पवित्रा कायम आहे .