Fri, Nov 16, 2018 17:20होमपेज › Marathwada › बिबट्याकडून वासराचा फडशा 

बिबट्याकडून वासराचा फडशा 

Published On: Mar 07 2018 2:44AM | Last Updated: Mar 07 2018 2:21AMलिमला  : शिवबाबा शिंदे

पूर्णा तालुक्यातील देऊळगाव देवठणा शिवारातील गोदापट्ट्यात बिबट्याने हाहाकार माजवला आहे. आज इथे, तर उद्या दुसर्‍या जागी दिसत असल्याने सुगीसराईच्या दिवसांत शेतशिवारात स्मशान शांतता 
पसरली आहे.  सदर बिबट्या रविवारी देऊळगावात दिसल्यानंतर सोमवारी मध्यरात्री देवठणा शिवारातील आखाड्यावर वावरत असल्याचे शेतकर्‍यांना दिसले. तेथे शंभर मीटरवर व्यंकटराव जोगदंड यांच्या शेतात गट नंबर 181 मध्ये वासराचा फडशा पाडला. यामुळे भयभीत शेतकरी तुतीच्या शेडवर जाऊन बसले. 

रविवारी देऊळगाव शिवारात ग्रामस्थांनी पाहिलेल्या बिबट्याबाबत वन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळ्े सोमवारी वासराचा जीव गेला. मंगळवारी दुपारी वनपाल एस. एम. चंद्रमोर, वनरक्षक एस. जी. नरवाडे यांनी पंचनामा केला. वरिष्ठांना कळविले आहे, तातडीने पिंजरा बसवला जाईल असे त्यांनी सांगितले.