Thu, Sep 20, 2018 02:11



होमपेज › Marathwada › पतीचा खून; पत्नीसह प्रियकरास जन्मठेप

पतीचा खून; पत्नीसह प्रियकरास जन्मठेप

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 9:44PM

बुकमार्क करा




लातूर ः प्रतिनिधी

सालगड्यासमवेत असलेल्या शरीरसंबंधात पतीचा अडसर येऊ नये म्हणून सालगड्याच्या मदतीने पतीचा खून करणार्‍या पत्नीस व तिच्या प्रियकरास येथील न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. अश्‍विनी अरुण देशमुख व सचिन प्रल्हाद कांबळे अशी त्यांची नावे असून ते लातूर तालुक्यातील चिकलठाणा या गावचे रहिवासी आहेत.  15 मार्च 2014 रोजी ही घटना घडली होती. अश्‍विनी देशमुख हिचे पती अरुण यांच्या शेतावर गावातील सचिन कांबळे हा सालगडी म्हणून कामास होता. दरम्यान, अश्‍विनीचे सचिनशी प्रेमसबंध जुळले. आपल्या प्रेमसंबंधात पती अडसर ठरू शकतो, अशी तिला शंका आली तिने पतीचा काटा काढायचे ठरवले. सचिन संधीची वाटच पाहात होता. 14 मार्च रोजी अरुणच्या भावकीत कंदुरी होती.

 त्यासाठी अरुण व सचिनही जेवावयास शेतावर गेले होते. जेवण झाल्यानंतर  रात्री साडेआठच्या सुमारास अरुण त्याच्या शेतावर गेला, तर सचिन गावात परतला. त्यानंतर तो कुर्‍हाड घेऊन शेतावर आला व त्याने अरुणवर कुर्‍हाडीचे  घाव घातले. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक गजानन भातलंवडे यांनी घटनास्थळ पंचनामा केला. गावात अश्‍विनी व सचिनच्या संबंधाची चर्चा होती. त्यावरून सचिनला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रारंभी आडेवेढे घेणारा सचिन पोलिसी हिसक्यापुढे सरळ झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर अश्‍विनीलाही ताब्यात घेतले व तिनेही गुन्हा कबूल केला. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्या. ए. एन पाटील यांच्या न्यायालयात खटला चालला. 14 साक्षीदार तपासले गेले.