Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Marathwada › गारपीटग्रस्तांना वेळेत मदत देणार : मुख्यमंत्री

गारपीटग्रस्तांना वेळेत मदत देणार : मुख्यमंत्री

Published On: Feb 15 2018 6:04PM | Last Updated: Feb 15 2018 6:04PMलातूर : प्रतिनिधी

राज्यातील सर्व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, त्यासाठीच तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत. याआधी एवढ्या तात्काळ पंचनामे कधीही करण्यात आले नव्हते, शेतकऱ्यांना विनाविलंब मदत मिळावी हाच या मागचा हेतू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

बीड जिल्ह्यातील नारायणगडाला जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर दुपारी दीड वाजता आगमन झाले. त्यांच्यासमवेत लातुरचे  पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, अहमदपुरचे आमदार विनायकराव पाटील, महापौर सुरेश पवार, यांची उपस्थिती होती. गडाला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस लातूर विमानतळातील विश्रामगृहात वीस मिनिटे थांबले. यावेळी बोलताना ते म्हणाले गारपिटग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. त्‍यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत मदत पोहचणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले