Tue, Apr 23, 2019 22:08होमपेज › Marathwada › ललिता लिंगबदलासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल

ललिता लिंगबदलासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:34PMमाजलगाव : प्रतिनिधी

लिंगबदल करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी महिला पोलिस ललिता साळवेस गृहविभागाने दिलेल्या परवानगी नंतर मुंबई येथील सर सेन्ट जार्ज हास्पिटल येथे दाखल झाली आहे.  

बीड पोलिस दलातील महिला पोलिस ललिता साळवेच्या लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून परवानगी मिळाली. त्यानंतर ललिता साळवे या सर सेन्ट जार्ज हास्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्या ठिकाण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या रक्त नमुन्याच्या विविध चाचण्या सुरू असून चाचण्यांचे अहवाल लवकरच येणार आहे. शस्त्रक्रियेबाबत आरोग्य विभागाच्यावतीने त्यांच्या मानसिकता चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्या नंतरच ललिताच्या इच्छेनुसार लिंगबदल शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया ललिता साळवे यांना स्वखर्चातून करावा लागणार आहे.