Sun, Jul 05, 2020 01:54होमपेज › Marathwada › आरोपी फाशीवर लटकतील तेव्‍हाच न्‍याय : मुंडे 

आरोपी फाशीवर लटकतील तेव्‍हाच न्‍याय : मुंडे 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मराठवाडा : प्रतिनिधी 

कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही. तरीही तिन्हीही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल पीडीतेला आणि तिच्या कुटुंबीयांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्हीही आरोपी फाशीवर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल. त्‍यासाठीची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे धनंजय मुंडे म्‍हणाले. 

कोपर्डी बलात्‍कार प्रकरणातील तिन्‍ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्‍यात आली. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

कोपर्डी बलात्‍कार प्रकरणातील आरोपींना मिळालेल्‍या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन यापुढे अशा घटनांना पायबंद बसेल. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण तातडीने जाहीर करावे. हा निकाल गुन्हेगारांना इशारा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्‍वास वाढवणारा आहे. या निकालासाठी  प्रयत्न करणा-या सर्व यंत्रणेचे मी आभार मानतो. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा, यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत, असेही मुंडे म्‍हणाले.