Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Marathwada › दिल्ली येथून बालकाचे अपहरण, अपहरणकर्ता भुसावळमध्ये जेरबंद

दिल्ली येथून बालकाचे अपहरण, अपहरणकर्ता भुसावळमध्ये जेरबंद

Published On: Jun 09 2018 10:15PM | Last Updated: Jun 09 2018 10:15PMभुसावळ: प्रतिनिधी

नवी दिल्ली येथून सहा वर्षीय बालकाचे अपहरण करून घेऊन जाणारा एक अपहरणकर्ता भुसावळ रेल्वे स्थानक आरपीएफ विभागाच्या सतर्कतेने जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.
नवी दिल्ली  येथील आरपीएफ केंट स्थानकाचे निरीक्षक शिवजी चौधरी व नवी दिल्ली विंदपूर पोलीस ठाण्याचे पोउपनि कर्तार सिंह यांनी भुसावळ आरपीएफला नवी दिल्ली येथील शुभम संतोष साहनी या ६ वर्षीय बालकाचे अपहरण झाले असुन ते मुंबईकडे  निघाल्याचे सांगत वर्णन सांगितला होता. त्यादृष्टीने भुसावळ रेल्वे स्थानक आरपीएफचे उपनिरीक्षक लवकुश वर्मा व कॉन्स्टेबल ओ. पी. मालवीया यांनी संशयावरून ११०७२ कामायनी एक्सप्रेसचया इंजिन जवळील सर्वसाधारण त्याची तपासणी केली असता त्यांना संशयास्पदरित्‍या बालक व तरूण दिसला. दोघांना त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व विचारणा केली.

 याबाबत दिल्ली पोलिसांची फोटो काढून पाठविला दोघ ओळख पटली आजचा ओळख पटली. नाव अपरणकर्त्याचे नाव गुड्डू किशोरी साहनी(वय २२) हे असून तो नवी दिल्ली येथील बुद्ध बाजार भागातील रहिवासी आहे. अपहरणकर्ता व बालक या दोघांना  आरपीएफने  ताब्यात घेतले असून दि.९ रोजी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.