Sat, May 30, 2020 00:32होमपेज › Marathwada › बीड : मला पळवून नेत होते, 'त्या' विद्यार्थ्याच्या सांगण्यामुळे खळबळ

बीड : मला पळवून नेत होते, 'त्या' विद्यार्थ्याच्या सांगण्यामुळे खळबळ

Last Updated: Feb 24 2020 1:27AM

महेश सोमनाथ खुराडेपरळी वैजनाथ : प्रतिनिधी 

अंबाजोगाईतील शालेय विद्यार्थी अपहरणाची घटना ताजी असतानाच परळी वैजनाथ येथे अपहरण फसल्याची बातमी समोर येत आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परळीच्या शिवाजी महाराज चौक परिसरात एक १४ वर्षीय शाळकरी मुलगा घाबरलेल्या अवस्थेत आला. त्याने उभ्या असलेल्या दोघांकडे फोन मागितला. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता " मी घाटसावळीचा आहे. मला पळवून नेत होते" असे सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्या शाळकरी मुलाचे नाव महेश सोमनाथ खुराडे (अंदाजे वय १४ रा. घाटसावळी तांडा) असे आहे.      

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेश खुराडे हा विद्यार्थी परळीच्या शिवाजी महाराज चौकात आला. तो घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याने तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांजवळ फोन मागितला. तसेच त्याच्याकडे उपस्थितांनी चौकशी केल्यावर, मी घाटसावळीचा आहे. वडवणी येथून अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाडीने आणले मला पळवून नेत होते, असल्याचे सांगितले. तसेच ज्यांनी मला गाडीत घातले ते लोक चहा प्यायला खाली उतरले असताना मी माझी सुटका करून घेतली आणि तेथून पळ काढला, अशीही हकीकत महेशने सांगितली. त्यावेळी परळी मार्गे त्याची अपहरणाची शक्यता व्यक्त करत उपस्थितांनी त्या मुलाला पोलिस ठाण्यात आणले. तेथेही त्याच्याकडे अंदाज काढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याने हीच हकीकत सांगितली. मात्र परळी शहर पोलिसांनी त्याचे वडील व मामा यांच्याशी सविस्तर चौकशी केली असता प्रथमदर्शनी आपहरणाचा संशय येत नसल्याचे सांगितले. 

तसेच वडवणी जवळील एका खडीमशिनवर त्याचे आई वडील काम करतात तर हा हा मुलगा ८ वीच्या वर्गात शिकत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तर त्याला आई वडील आपल्यासोबत कामावर येण्यासाठी सांगत होते. पण तसे त्याचे मनात नव्हते. त्यावरून महेश आणि त्याच्या वडिलांच्यात कुरबुरी झाली होती. आज सकाळी  कटिंग करुन येण्याच्या बहाण्याने तो घराबाहेर पडला होता. येताना दळण घेऊन येण्यास त्याला सांगितले होते. त्यासाठी त्याला दोनशे रुपयेही दिल्याचे त्याच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले. 

घरातून दिलेले पैसे खर्च केले, दळण घेतले नाही, केसही कापले नाहीत. त्यामुळे घरी रागाला सामोरे जावे लागेल या भितीने हा मुलगा परळीला निघून आला असावा. तसेच कोणी काही बोलू नये म्हणून "मला पळवून नेत होते" असा बनाव त्याने केला असावा अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरीही पोलिस सर्वदृष्टीने तपास करीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पहाणी व या मुलाचे पालक प्रत्यक्षात आल्यानंतर या मागचे तथ्य समोर येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.