Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Marathwada › जिंतूर पोलिसांकडून मारहाण झाल्याची अधीक्षकांकडे तक्रार 

जिंतूर पोलिसांकडून मारहाण झाल्याची अधीक्षकांकडे तक्रार 

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:43AMपरभणी : प्रतिनिधी   

जिंतूर येथे 31 जुलै रोजी रात्री 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्याजवळून जात असलेल्या संतोष हरिश्‍चंद्र जाधव (रा. जालना रोड, जिंतूर) यांना बोलावून घेऊन पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक सुरेश नरवाडे व बीट जमादार यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार 1 ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. 

रस्त्यावरून बोलावून घेत अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मारहाणीत संतोष जाधव यांच्या छाती, डोक्यात, पायावर, पाठीवर गंभीर मार लागून ते जखमी झाले. छातीमध्ये मार लागल्याने त्यांना रक्‍ताच्या उलटही झाल्या. 

घडल्या प्रकाराची माहिती त्यांच्या घरी कळतात भावाने त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे जाधव यांचे कुटुंबीय भयभीत झाले असून संतोष जाधव यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी संबंधित मारहाण करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा पत्नी, मुलाबाळांसह संपूर्ण कुटुंब उपोषणास बसेल, असा इशारा दिलेल्या निवेदनात दिला आहे.