Sat, Jan 19, 2019 05:41होमपेज › Marathwada › परंडा : वर्धमान ज्वेलर्स दुकानात चोरी

परंडा : वर्धमान ज्वेलर्स दुकानात चोरी

Published On: Jan 09 2019 2:28PM | Last Updated: Jan 09 2019 1:15PM
परंडा : प्रतिनिधी 

परंडा येथील मंडई बाजार पेठेतील वर्धमान ज्वेलर्स दुकानामध्ये बुधवारी (दि. ९) मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास अज्ञात दरोडे खोरांनी सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे परंडा शहरात व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील मुख्य बाजार पेठेमध्ये मयूर मनोज बेदमुथ्था यांचे वर्धमान ज्वेलर्स या नावाने सोन्या- चांदीचे दुकान आहे.या दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्याकडून चोरी झाली आहे. त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ५ ते ६ दरोडेखोर दिसत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा मनोज बेदमुथ्था यांचा मुलगा मयूर यांच्या मोबाईलला जोडला गेला असल्याने सदर चोरीची माहिती पोलिस स्टेशनला मिळाली आहे. त्यानंतर परंडा पोलिस घटनास्थळी पोहचले असता दरोडेखोर पसार झाल्याचे लक्षात आले. 

परंडा शहरात सोन्याच्या दुकानात शस्त्रधारी दरोडा पडल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाकडून सकाळी ११ वाजेपर्यंत पंचनामा करण्यात आला असुन पुढील तपास करण्यात येत आहे.