Sat, Jan 19, 2019 14:06होमपेज › Marathwada › सुसंगती असेल तरच जीवनात प्रगती

सुसंगती असेल तरच जीवनात प्रगती

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:00AMशिरूर : प्रतिनिधी

ईश्‍वराच्या नामात अद्भूत शक्ती असून सुसंगती असेल तर माणसाची प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केले. वै. आबादेव महाराज यांनी सुरू केलेल्या महाशिवरात्री सोहळ्याच्या 40 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी शिरूर येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना वेदांताचार्य विवेकानंद शास्त्री म्हणाले की, वक्ता आणि श्रोता हा अलंकापुरीतच एकत्र येतो. कीर्तन, गायन, वादन एकरूप होऊन चालते. तन-मन-धनाने वारकरी सांप्रदाय एकत्र येतो. विशेष म्हणजे या सप्ताहात सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी होतात. या संस्थानचे वैभव आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून वाढले आहे. 25 लाख रुपये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून त्यांनी मंजूर केले आणि या क्षेत्राचा विकास झाला. यावेळी दिलीप गोरे, वैजीनाथ तांदळे, सुधाकर तांदळे, सभापती राणी बेद्रे,  शिवाजी पवार, संजय सानप, आयूब तांबोळी, जिजा आघाव, सरपंच आघाव, प्रकाश इंगळे, काटे, कलंदर पठाण, नागेश सानप, सुभाष क्षीरसागर, किरण सानप, मीना उगलमुगले, संतोष कंठाळे, सुलेमान पठाण, लहू ढाकणे, सुधाकर मिसाळ, शरद ढाकणे, पं. स. सदस्य सरवदे, शेख बाबा, पाटील, अक्षय रणखांब, कांता रणखांब, प्रवीण नागरगोजे, आण्णा राऊत, प्रकाश देसरडा, चंद्रकांत महाराज वारंगुळेकर आदी उपस्थित होते.