Thu, Jul 02, 2020 21:15होमपेज › Marathwada › जळगाव :  तलाट्‍यास लाच प्रकरणी सात वर्षाची शिक्षा 

जळगाव :  तलाट्‍यास लाच प्रकरणी सात वर्षाची शिक्षा 

Published On: Jul 30 2018 6:01PM | Last Updated: Jul 30 2018 6:01PMजळगाव :  प्रतिनिधी 

सातबारा उतार्‍यातून बहिणीचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदारांकडून तात्कालीन तलाठी दोषी ठरवत तीन वर्ष शिक्षा व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची यांना तक्रारदारांकडून 1500 रूपयांची लाच घेतांना अटक केली होती. याबाबत रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तक्रारदार यांनी लाचलुचत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी सापळा रचून आरोपी तात्कालीन तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांना तक्रारदाराकडून 1500 रोख रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर रामानंद पोलिसात  लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

न्यायालयाने आज तलाठी यास दोषी ठरवून चार वर्षाची शिक्षा आणि 5 हजार रूपये दंड तर दुसर्‍या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड अशा दोन शिक्षा ठोठावण्यात आल्‍या आहेत.