Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Marathwada › अजित पवारांची शेतकऱ्याला १ लाखाची मदत(Video)

अजित पवारांची शेतकऱ्याला १ लाखाची मदत(Video)

Published On: Jan 19 2018 11:37AM | Last Updated: Jan 19 2018 11:47AMलातूर : प्रतिनिधी

वीज महावितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून कंपनीच्या ऑफिसमध्ये औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची आज अजित पवार यांनी भेट घेतली. शहाजी धीरू राठोर असे  एकंबी तांडा येथे राहणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

वीज महावितरणने राठोड यांना कृषीपंपाचे बील ५९,४०० हजार पाठवले होते. या  बिलाचा भलामोठा आकडा पाहून त्यांनी महावितरण ऑफिसमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अजित पवार यांनी रुग्णालयात राठोड यांची भेट घेतली. त्यांना १ लाख रुपयांची मदतही करण्यात आली. यावेळी सुनील तटकरे, धनंजय मुंडे , सतीश चव्हाण, विक्रम काळे उपस्थित होते.