Wed, Feb 20, 2019 20:56होमपेज › Marathwada › इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

Published On: Mar 05 2018 1:35AM | Last Updated: Mar 04 2018 1:51AMवडीगोद्री : प्रतिनिधी                      

येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याच्या जिल्ह्यातील पहिल्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन कारखान्याच्या अध्यक्षा शारदा टोपे यांच्या हस्ते शनिवार, 3 रोजी करण्यात आले. 

या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, जिल्हा बँकेचे चेअरमन मनोज मरकड, कारखान्याचे संचालक श्रीरंग पैठणे, सरदारसिंग पवार, फत्तेयाबखान पठाण, शेषराव जगताप, नरसिंगराव मुंढे, बाबासाहेब कोल्हे, पाराजी सुळे, त्र्यंबकराव बुलबुले, सदाशिव दुफाके, सुधाकर खरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.टी.पावसे, जनसंपर्क अधिकारी सुधाकराव चिमणे आदींची उपस्थिती होती. 

कारखान्यात  साखर, वीज व अल्कोहोल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. कारखान्याने डिस्टिलरी प्रकल्पामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी मॉलीक्युलरसिव इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केली आहे. डिस्टिलरी प्रकल्पामधून निघणार्‍या अल्कोहोलला 30 रुपये प्रति लिटरप्रमाणे दर मिळत आहे. ब्राझीलसारख्या देशाने यामध्ये मोठी प्रगती केलेली आहे.

भारत सरकारने पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे इथेनॉलची खरेदी ऑईल कंंपनीकडून केली जाते. इथेनॉलला सध्या रु. 40.85 प्रतिलिटरप्रमाणे दर मिळत आहे. अल्कोहोलपेक्षा इथेनॉलला दर जास्त मिळत आहे. 

अवघ्या दोन महिन्यांमध्ये प्रकल्पाची उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. फक्त साखर उत्पादनावर समाधान न मानता इतर विविध उपप्रकल्प निर्माण करण्याचे काम कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याने केलेले आहे. विविध प्रकल्पांतून अधिकचे उत्पादन मिळाल्याने शेतकर्‍यांच्या उसाला अधिक चांगला भाव देण्यास याची निश्चित मदत होत आहे.