Mon, Apr 22, 2019 12:32होमपेज › Marathwada › भांडवलशाहीने शेतकरी देशोधडीला लागला

भांडवलशाहीने शेतकरी देशोधडीला लागला

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:09PMमाजलगाव : प्रतिनिधी

शेती व्यवसाय हा देशाच्या गळ्यातील लोढणे झाला आहे. भांडवलशाहीच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला असल्यानेच आत्महत्यांचे सत्र वाढले असल्याचे मत सुशील धसकटे यांनी व्यक्त केले. दहाव्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखा माजलगाव च्या वतीने आयोजित केलेल्या 10 व्या शिवार साहित्य संमेलनाचे आज रविवारी उद्घाटन डॉ. छाया महाजन यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी  स्वागत अध्यक्ष श्रुतुजा आनंदगावकर, पूर्व अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.  सुनील धसकटे म्हणाले की, आपल्या मातीतील भाषेवर प्रेम करा, आपली पिढी इंग्रजाळली असल्याने मराठी भाषा बोलण्याची लाज वाटत आसल्याचे चित्र हल्ली पुण्या-मुंबईत  दिसते.  शिवार साहित्य संमेलन भरत आसले तरी शिवारात राहाणार्‍यांची संख्या रोडवत चालली आहे. सध्या आपल्या देशाची व्यवस्था भांडवलदारांच्या हातात असल्यामुळे या देशातील शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव चालू असून हा भाग इकॉनामिक झोन होणार आहे. या मुळे शेतकर्‍यांचे शेती मालाला भाव न मिळू नये म्हणून भाव पाडण्याचे काम सध्या होत आहे. म्हणूनच शेतकरी आत्महत्या करत आहे. खरा साहित्यिक व्हायाचे असेल तर खेड्याबाबत मनात सच्चेपणाची भावना असेल तरच ते शक्य असल्याचे साहित्यिक सुशील धसकटे यांनी सांगितले.

स्वागत अध्यक्ष श्रुतुजा आनंदगावकर, प्रा. डॉ. भाऊसाहेब राठोड यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा.डा.रमेश गटकळ यांनी तर अभार बालासाहेब झोडगे यांनी केले.

संमेलनात कथाकथनाने रंगत

मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेच्या वतीने मंजरथ येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शिवार साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात कथाकथनाच्या कार्यक्रमाने संमेलनात रंगत आणली.
या कथाकथनाच्या सत्राच्या अध्यक्ष स्थानी प्रा. स्नेहल पाठक होत्या. या कथाकथनात मधुकर बैरागी व आर्चना डावरे यांनी सहभाग नोंदवला होता. सुरुवातीला आर्चना डावरे यांनी स्त्रियांच्या भोगवटा मांडणारी  सटवा  ही कथा सादर करून मालतीबाई यांनी पतीनिधनानंतर दाखवलेले धाडस या कथेतून मांडले होते. तर या नंतर मधुकर बैरागी यांनी  लगीन, ही विनोदी कथा सादर करून या कथेतील विविध प्रसंगामुळे रसिकांना खळखळून हसवले तर अध्यक्ष समारोप प्रा. स्नेहल पाठक यांनी निरोप ही कथा सादर करून  समारोप केला.

या  कथांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  या कथा कथनाच्या सत्राचे सूत्रसंचालन केशव दीक्षित यांनी तर अभार प्रा. प्रशांत भोले यांनी केले. या वेळी संमेलन अध्यक्ष सुशील धसकटे, स्वागत अध्यक्ष श्रुतुजा आंनदगावकर, रंगनाथ सावंत, दत्ता डाके, राजेंद्र आनंदगावकर, राजश्री आंनदगावकर, प्रा. रावसाहेब देशमुख, अरुण भंडारी, रामदीप डाके, शैलेश पाठक, गौरी देशमुख, स्मिता लिंबगावकर, किशोर गुंजकर, सरला बिंदू, मंगेश उपाध्ये, सतीश आस्वले, नितीन मोरे आदींसह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

 

Tags : beed, Majalgaon news, Shivalar Sahitya Sammelan, Inauguration,