Thu, Jul 18, 2019 10:25होमपेज › Marathwada › उन्हाच्या कडाक्यात ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ मनोरंजनाचा थंडावा

उन्हाच्या कडाक्यात ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ मनोरंजनाचा थंडावा

Published On: Apr 28 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 11:29PMपाटोदा : प्रतिनिधी

एप्रिल महिना सरत चालला असून आता दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत चालला असून सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. अशा या गरम वातावरणात आता सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी -ट्वेंटी अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे दररोज सायंकाळी सामने होत आहे. दिवसभर कडक उन्हात हैराण झालेले नागरिक सायंकाळी टीव्हीसमोर बसून या क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेत असून त्यांना यामुळे मनोरंजनाचा थंडावा मिळत आहे .

दि. 12 एप्रिलपासून सुरू झालेल्या या आयपीएल सामन्याची स्पर्धा दि. 27 मेपर्यंत रंगणार आहे. सध्या ग्रामीण भागातही या आयपीएलची प्रचंड क्रेझ वाढली असून सायंकाळ होताच तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही टीव्हीसमोर बसून मॅचचा आस्वाद घेत आहेत .

हॉटेल,  दुकानांमध्येही गर्दी

सध्या दररोज दोन सामने होत असून हे सामने पाहण्यासाठी शहरातील दुकाने (ज्या ठिकाणी टीव्हीची व्यवस्था आहे) अशा ठिकाणी लोक या सामन्यांचा एकत्र आस्वाद घेत आहेत तर काही हॉटेलांमध्येही खास स्क्रिनची व्यवस्था असून त्या ठिकाणी ही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अर्थातच हॉटेलचालकांचाही व्यवसाय वाढत आहे.

आवडत्या संघांना पसंती

आयपीएलमध्ये अनेक संघ व विविध देशांतील अनेक खेळाडू खेळत असले तरीही ग्रामीण भागातील चाहते आपले विशेष आवडते खेळाडू ज्या संघात असतील त्या संघांचे सामने बघण्यास अधिक पसंती देत आहेत. यामध्ये प्रामुख्यने आपला संघ म्हणून रोहीत शर्माचा मुंबई इंडियन्स, तर आवडते खेळाडू म्हणून एम. एस. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स व विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला चाहते अधिक पसंती देत असून सामने संपेपर्यंत ते पाहण्याबरोबरच निकालाच्या अंदाजाविषयी पैजा व चर्चा यांमुळेही मोठे मनोरंजन होत आहे. याबरोबरच विविध गावांमध्ये स्पर्धांचेही आयोजन केले जात आहे.