Tue, Apr 23, 2019 06:13होमपेज › Marathwada › लग्नानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यात तलाख

लग्नानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यात तलाख

Published On: May 07 2018 9:59PM | Last Updated: May 07 2018 9:59PMकेज : दीपक नाईकवाडे

तालुक्यातील कुंबेफळ येथील शेख कुटुंबातील मुलीचा विवाह तुळजापूर येथील शेख परिवारातील मुलासोबत झाल्यानंतर नवरदेवाचे त्याच्या चौदा वर्षाच्या मेव्हण्याने  बूट लपविल्याने नवरदेवाने मेव्हण्यास यथेच्छ चोप दिल्यानंतर दोन्ही गटात मारामारी झाली. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गेल्या नंतर लग्ना नंतर काही तासातच नवविवाहितेस पोलीस ठाण्यात तलाख देण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. 

तालुक्यातील कुंबेफळ येथील शेख परिवारातील मुलीचा विवाह तुळजापूर येथील शेख परिवारातील युवका सोबत रविवारी सकाळी साडे दहा वाजता होणार होता, मात्र तुळजापूर येथून वर्‍हाड उशीरा आल्याने हा विवाह दुपारी एक वाजता झाला विवाहा नंतर नवरदेवाच्या चौदा वर्षांच्या मेव्हण्याने नवरदेवाचे रितीरिवाजा प्रमाणे बूट लपवून ठेवले याचा राग नवरदेवास आल्याने त्याने चौदा वर्षांच्या मेव्हण्यास यथेच्छ चोप दिला. याचा जाब सासरेबुवानी विचारल्यानंतर त्यांनाही नवरदेवाने मारहाण केली लग्नमंडपात लग्न लागल्यानंतर असा काही प्रकार होईल याचा विचार कोणीही केला नव्हता. आनंदाचे क्षण काही मिनिटातच क्रोधाचे बनल्याने लग्नमंडपात मारामारी चालू झाली. दोन्ही गट आपापसात मारामारी करु लागले.

हा प्रकार गावचे सरपंच किशोर थोरात यांना समजल्याने त्यांनी लग्नमंडपात धाव घेत दोन्ही गटाना समजावून सांगितले मात्र तोपर्यंत नवरदेवाने पोलीस ठाणे गाठले होते. त्यामुळे दोन्ही गटाचे प्रमुख पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर नवर्‍या मुलाकडील मंडळीने मुलीला घेऊन जाण्याची तयारी दर्शविली मात्र मुलीच्या पित्याने काहीही झाले तरी मुलीला पाठवणार नाही तिला तलाख द्या अशी कणखर भूमिका घेतल्याने रविवारी रात्री युसूफ वडगाव पोलीसांनी काझीला हुडकून आणुन लग्नाच्या पाच तासानंतर नवविवाहित मुलीस पोलिसा ठाण्यात पोलिसा समक्ष तलाख दिला. यावेळी युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे,  कुंबेफळचे सरपंच किशोर थोरात , आबा थोरात, विलास थोरात यांच्यासह वधू व वर पक्षाची मंडळी उपस्थित होती.