Sat, Feb 23, 2019 18:23होमपेज › Marathwada › बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी लाचलूचपतच्या जाळ्यात

बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी लाचलूचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 05 2018 4:45PM | Last Updated: Jan 05 2018 4:44PM

बुकमार्क करा
बीड :  प्रतिनिधी

मागील वर्षी दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी आणि सॉ मिल परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत यास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, एसीबी औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली. बीड एसीबीची ही नवीन वर्षातील पहिलीच कारवाई आहे.