Wed, Sep 26, 2018 08:18होमपेज › Marathwada › द्राक्षबागेतून दहा महिन्यांत अकरा लाखांचे उत्पन्न

द्राक्षबागेतून दहा महिन्यांत अकरा लाखांचे उत्पन्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केज : दीपक देशपांडे

दोन एकर क्षेत्रावर जून 17 मधे लागवड केलेल्या द्राक्ष रोपापासून 3 लाख रुपये खर्चुन फक्त 10 महिन्यांत 11 लाख रुपयांचे उत्पन्न  काढण्याची किमया बीड जिल्ह्यातील बंदेवाडी येथील शेतकर्‍याने केली आहे. केज तालुक्यातील बंदेवाडी येथील शेतकरी श्रीराम गोवर्धन जगताप  पदवीधर व कृषी पदविकाधारक आहेत. त्यांना 15 एकर पेक्षा जास्त शेती असून त्यासाठी त्यांनी परिवहन मंडळातील वाहकाची नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांच्याकडे 9 एकर क्षेत्रावर जी.9 जातीची केळी आहेत. त्या शिवाय हूर जातीची 40 आंब्याची झाडे आहेत.सर्व शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरून केली जात असताना कृषी विभाग मात्र काहीही सहकार्य करीत नसल्याची खंत जगताप यांनी व्यक्त केली.  

द्राक्ष पीक लागवड करताना जानेवारी 17 मध्ये त्यांनी जमीन नांगरून मोगडा करून तयार केली. ड्रीप टाकून बेड तयार केले. 9 बाय 5 फूट अंतरावर रोप लागवड केली. जुन 17 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील हिंगणी येथील नागरगोजे यांच्याकडून सुपर सोनाका जातीची काडी आणून कलम केले. द्राक्ष येत नसते ते बनवावे लागते. या जाणीवेतून जगताप यांनी सूत्रबद्ध नियोजन केले. बेड तयार करतानाच सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताच्या एकूण मात्रेपैकी 70 टक्के मात्रा जमिनीत दिली. शेतातील सर्व कामात पत्नीची मोलाची साथ मिळाल्याचे जगताप सांगतात. शेतकरी सक्षम असला तरीही त्यास घरच्यांची मदत असावीच लागते, त्यांचे वडील व पत्नी या दोघांनी खंबीरपणे ती दिली. 

Tags : Marathwada, Marathwada News, 10 months, Eleven lakh Rupees, profit, Grape farm


  •