होमपेज › Marathwada › गारपीटग्रस्तांना तातडीने मदत द्या

गारपीटग्रस्तांना तातडीने मदत द्या

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 1:43AMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी केली. धोंडराई येथे पडलेल्या दरोडाच्या घटनेतील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच खळेगाव, उमापूर, माटेगाव, धोंडराईसह आदी भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी  संवाद साधला. 

आ. अमरसिंह पंडित यांनी तालुक्यातील खळेगाव, उमापूर, माटेगाव, धोंडराई सह आदी ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी त्यांनी सुसंवाद साधला. मौजे खळेगाव येथील रामेश्‍वर आहेर, शांतीवन साळवे या शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसानीची पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, श्रीराम आरगडे आदी उपस्थित होते. या वेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आ.अमरसिंह पंडित यांना निवेदन देऊन शासन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. गेवराई तालुक्यातील शेतकरी सुरक्षित राहिला नाही, शेतवस्त्यांमध्ये सतत दरोडे पडत असून दरोडेखोरांच्या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी होत आहेत, दरोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. मौजे धोंडराई येथील दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यातील जखमी शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांनी सर्व भयभीत शेतकर्‍यांच्या वस्त्यांमध्ये भेट देऊन शेतकर्‍यांना धर दिला. यावेळी भरत खरात, नारायण नवले, किरण खरात, भास्कर खरात, पोपटसिंग राजपूत, अशोक नारोटे, बाबासाहेब बनसोडे, रामलाल निकम, मच्छिंद्र खरात या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.