Sat, Jul 20, 2019 15:28होमपेज › Marathwada › गुणवत्ता असेल तर जातपात आडवी येत नाही : आ.क्षीरसागर 

गुणवत्ता असेल तर जातपात आडवी येत नाही : आ.क्षीरसागर 

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:17AMकेज : प्रतिनिधी

अनेक ठिकाणी उर्दू माध्यमातील शाळांची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे. ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजातील लोकांसाठी काही तरी करण्याची इच्छाशक्ती असणे ही मोठी बाब आहे. गुणवत्ता असेल तर कुठलीही जातपात आडवी येऊ शकत नाहा असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

केज शहरातील नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी सत्कार व गुणवंताचा सत्कार आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती संतोष हंगे, दिनकर कदम, रमेश आडसकर, अ‍ॅड. शेख शफिक, नसीर इनामदार, नगराध्यक्ष आदित्य पाटील, सचिन देशपांडे, विजयकांत मुंडे, जमील इनामदार, डॉ.महमंद इलियास, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निझाम, गिरीश देशपांडे आदी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना आ. क्षीरसागर म्हणाले की, संस्था उभारणी करणे सोपे आहे पण ती टिकवणे अवघड आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडीत संस्था चालवने तारेवरची कसरतच असते. माणसामध्ये गुणवत्ता असेल तर कुठलीही जातपात आडवी येऊ शकत नाही. ध्येयपूर्तीसाठी गुणवत्ताच लागते.  चांगले संस्कार वाया जात नाहीत पण अहंकाराने माणूस वाया जातो असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.