Wed, Apr 24, 2019 11:47होमपेज › Marathwada › यशोधरा बुद्ध विहार येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

यशोधरा बुद्ध विहार येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:04PMमाजलगाव : प्रतिनिधी

रोजी शहरातील फुले नगर येथील यशोधरा बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे हे होते. स्वागत अध्यक्षस्थानी आर. एम. कांबळे हे होते. कार्यक्रम हा तीन सत्रात आयोजित केला होता. सकाळी भन्ते  शरणानंद  महाथेरो पाथरी यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. त्यानंतर बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक शहरात काढण्यात आली होती. फुले नगर ते आंबेडकर चौक असे मार्गक्रमण करत भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिवाजी चौक मिरवणूक आणण्यात आली व तेथून यधोधरा बुद्ध विहार येथे पोहोचली.  त्यानंतर बुद्ध मूर्तीला विहारात स्थापन केले. दुपारी  भन्ते महाथेरो,  शिलरत्न,  बुद्ध शरण बोधी यांनी धम्म देसना दिली. आ. आर. टी. देशमुख  यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमास नगराध्यक्ष सहाल चाऊस, विजय साळवे, तोफिक पटेल, कचरू खळगे, सुहास बोराडे, डॉ.श्रीराम खळगे, अंकुश जाधव, धम्मानंद साळवे, श्रीहरी मोरे, मुरली साळवे,  नवनाथ धाईजे, राजेश साळवे, अविनाश बनसोडे, सुशांत पौळ आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  सचिन डोंगरे, बाबासाहेब जाधव, ससाणे, अ‍ॅड. सुजीत कांबळे, किरण खळगे, सुधाकर वाघमारे, जावळे, खळगे, सोनपसारे, यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Tags : Marathwada, Idol, installation, ceremony, Yashodhara, Buddha, Vihar