Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Marathwada › हिवरसिंग्याचे रताळे पोहोचले राज्यभरात 

हिवरसिंग्याचे रताळे पोहोचले राज्यभरात 

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:38AMआर्वी : जालिंदर नन्नवरे

तालुक्यातील हिवरसिंगा येथील रताळे काढणीला वेग आला आहे.  महाशिवरात्रीनिमित्त औंरगाबाद, पुणे लातूरसह राज्यभरामध्ये रताळे पोहोचले आहेत. यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

रताळा उत्पादनात हिवरसिंगा हे महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे. सध्या हिवरसिंगा येथील शेतकरी पुणे, नांदेड, लातूर, औंरगाबादसह विविध जिल्ह्यासह राज्यभरामध्ये रताळी विकण्यासाठी गेले आहेत. मागील जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून हिवरसिंगा येथे रताळाची लागवड केली जात असल्याचे येथील वयोवृद्ध लोक सांगतात, मात्र चार-पाच वर्षांपासून पाऊसकाळ कमी होता व डुकरांचा उपद्रव त्यामुळे येथील उत्पादन घटले होते.  यावर्षी पाऊसकाळ चांगल्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे रताळाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हिवरसिंगा येथील शेतकरी हे महाशिवरात्री चार-पाच दिवसांवर येताच रताळे काढणी चालू करतात. यामुळे रताळे महाशिवरात्रीला मार्केटला घेऊन जाता येतात. या वर्षी चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस व हवामान आसल्यामुळे हिवरसिंगासह हिवरसिंगा परिसरातील वाडीवस्तीवर रताळाची लागवड केलेली आहे. यातून गावात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.        

 मी एका एक्करमाध्ये रताळाची लागवड केली आसून मी औंरगाबादच्या मार्केटला रताळे विकली आहेत. सरासरी माझा एकरी पंधरा हजार रुपये खर्च झाला असून मला एक लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे.

 - हनुमान सानप, शेतकरी