Sun, Apr 21, 2019 14:36होमपेज › Marathwada › हिंगोली : दोन विवाहित महिलांच्या आत्महत्या

हिंगोली : दोन विवाहित महिलांच्या आत्महत्या

Published On: Sep 02 2018 6:55PM | Last Updated: Sep 02 2018 6:55PMडोंगरकडा : प्रतिनिधी

हिंगोली जिल्‍ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून जवळ असलेल्या महालिंगी तांडा परिसरात दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आत्‍महत्या दोघींनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

धर्मापूर तांडा (ता. लोहा, जि. नांदेड) येथील माहेर असलेल्या सीमा बालाजी राठोड (वय १९) व निखीता राजू राठोड (२०) अशा दोघींचे लग्न कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे करून देण्यात आले होते. या दोघींमध्ये भाची, आत्याचे नाते होते. सीमा ही भाची तर निखीता राठोड ही आत्या होती. दोघीनी एकाच दोरीने दाट झाडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यातील सीमा हिने आधी एक दिवस पतीसोबत शेतात पिकाला फवारणी केली होती. दुसर्‍या दिवशी आपला पती शेतात गेल्यानंतर सीमा व निखीता अशा दोघींनी ही रविवारी (दि.२) दुपारी आत्महत्या केली
सीमा हिचा पती बालाजी राठोड यांना आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच बालाजीने विषारी द्रव्‍य प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आखाडा बाळापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, सपोनि ओमप्रकाश चिंचोळकर, भगवान वडकिल्ले, बापुराव वाबळे आदींनी भेट देवून पंचनाम केला.