Sat, Feb 16, 2019 10:42होमपेज › Marathwada › हिंगोली : कृषी सहाय्यक लाचलूचपतच्या जाळ्यात

हिंगोली : कृषी सहाय्यक लाचलूचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 31 2018 4:24PM | Last Updated: Jan 31 2018 4:24PMहिंगोली : प्रतिनिधी

म्हैस खरेदीसाठी वीस हजाराचे अनुदान मिळविण्यासाठी फाईलवर सह्या करून धनादेश मिळवून देण्यासाठी सेनगाव तालुक्यातील केंद्रा येथील कृषी सहाय्यक यास एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. पथकाने दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास हिंगोली शहरातील शिवाजीनगर भागात लाचेसह ताब्यात घेतले.

सेनगाव तालुक्यातील जामठी येथील संतोष शिंदे यांच्या भावजईने अल्पभूधारक असल्याने कृषी विभागाकडून म्हैस खरेदीसाठी वीस हजार रूपयाचे अनुदान मिळविण्यासाठी फाईल तयार केली होती. या फाईलवर सह्या करून अनुदानाचा धनादेश मिळवून देण्यासाठी संतोष शिंदे यांच्याकडे केंद्रा येथील कृषी सहाय्यक सुनील शिवाजी सातपुते (वय ३०) याने आठ हजारची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून कारवाई केली. दि. ३१ रोजी सकाळी शिवाजीनगर भागातील पाचपुते यांच्या खोलीमध्ये आठ हजाराची लाच स्विकारताना सातपुते यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपाधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, शेख उमर, सुभाष आढावा, अभिमन्यू कांदे, शेख जमीर, ओमप्रकाश पंडीतकर, विजयकुमार उपरे, संतोष दुमाने, महारूद्र कबाडे, प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, आगलावे यांच्या पथकाने केली.