Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › जोरदार पावसाने बाजरीला फटका

जोरदार पावसाने बाजरीला फटका

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:16AMबीड : प्रतिनिधी

बुधवारी गेवराई, धारूर, बीड तालुक्यातील काही गावांत गारपीट तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी वाराही सोसाट्याचा असल्याने झाडेही पडली आहेत. या पावसामुळे भाजीपाला, फुलार्‍यात आलेली बाजरी आदी पिकांना फटका बसला आहे. बुधवारी दुुुपारी ऊन, सायंकाळी पाऊस व नंतर थंडी असल्याने नागरिकांना एकाच दिवसात ऊन, पाऊस व थंडीचा अनुभव घेता आला.

सोमवारी व मंगळवारी काही ठिकाणी गारा पडल्या होत्या, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळपासून ऊन होते. दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा होता. सायंकाळी पाचच्या सुुमारास बीड शहरात पाऊस सुरू होता. या दरम्यान, बीड शहरातील नगर रोड, धानोरा रोड, पंचशिल नगर या भागात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांना पावसाचा मारा सहन करावा लागला.  दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.

गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी, पाडळसिंगी, मादळमोही, शिरसमार्ग, हिरापूर तसेच बीड तालुक्यातील राजुुरी, नामलगाव, पेंडगाव, पारगाव, पाली, पिंपळनेर, धारूर तालुुुक्यातील कन्नापूर, मोहा, बोडखा, नित्रूड, शिरूर आदी गावात पाऊस झाला. पावसासह सोसाट्याचे वारेही होते. यामुळे कडबा गंजीचेही नुकसान झाले आहे. वार्‍यामुळे अनेक शेतातील बाजरी पडली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते, दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून उन्हाची काहिली वाढली आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासाही मिळत आहे.

Tags : Marathwada, Heavy, rains, Damage, Bajra