Sun, Aug 25, 2019 08:58होमपेज › Marathwada › साप हातात घेऊनच तो गेला रुग्णालयात

साप हातात घेऊनच तो गेला रुग्णालयात

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 9:59PMबीड : प्रतिनिधी

साप... साप... असे नाव घेताच अनेकांनी भंबेरी उडते. मग, चावल्यावर तर विचारणाच नको. असे असतानाही एका तरुणाने चक्क साप चावल्यानंतरही त्या सापाला पकडून सापासह जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. सापासह तरुण आल्याने डॉक्टरही आवाक झाले होते, मात्र उपचाराची गरज ओळखून डॉक्टरांनी तत्काळ तरुणावर उपचार केले. ही घटना जिल्हा रुग्णालयात सकाळी नऊच्या सुमारास घडली.

बीड शहरातील काळा हनुमान ठाणा परिसरातील रहिवासी लखन गायकवाड यास शनिवारी सकाळी साप चावला. यानंतर घाबरून न जाता त्याने त्याच सापाला पकडले व जिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी डॉक्टर, नर्सही काहीवेळ आवाक झाल्या होत्या.

तरुणाला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. लखन याच्या एका हाताला सलाईन तर दुसर्‍या हातात साप होता. लखनच्या हातातील साप घ्यायचा कोणी ? हा साप रुग्णालयात सोडायचा कसा? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यानंतर मात्र सर्पमित्र अमित मगर यांना बोलावण्यात आले. त्यांनी लखनच्या हातातील साप काढून घेतला. साप जिवंत असून त्यास एका बंद भरणीत ठेवण्यात आले आहे. सापाला जिवंत रुग्णालयात आणले, यासह  लखनच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.