Tue, Feb 19, 2019 02:25होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस

लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस

Published On: Feb 13 2018 9:47PM | Last Updated: Feb 13 2018 9:47PMलातूर : प्रतिनिधी

अहमदपूर तालुक्यातील राळगा, रुई व खंडाळी या गावांत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अर्धा तास गारपीट झाली. यामुळे पीके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, निलंगा तालुक्यात वादळी पाऊस झाल्याने विद्यूत खांब व ट्रॉन्सफॉरमर कोसळले आहेत.

यावेळी वादळ सुटल्याने अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटून विजप्रवाह खंडीत झाला आहे. चिंच, आंबा, हरभरा, गहू, ज्वारी, ऊस आदींचे नुकसान झाले.

राणी अंकुलगा येथे झालेल्या वादळी पावसाने गुरहाळात पावसाचे पाणी शिरले व गुळ भिजला.