Fri, Sep 21, 2018 02:10होमपेज › Marathwada › लातूर मंडळात बारावीचे ८७ हजार विद्यार्थी

लातूर मंडळात बारावीचे ८७ हजार विद्यार्थी

Published On: Feb 20 2018 7:03PM | Last Updated: Feb 20 2018 7:05PMप्रतिनिधीः लातूर

बारावीच्या परीक्षेस बुधवारपासून सुरुवात होत असून लातूर मंडळांतर्गत ८७ हजार ४६९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेकरीता १९५ केंद्र आहेत. लातूर परीक्षा मंडळात लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. 

लातूर जिल्ह्यात ३४ हजार ३३६ विद्यार्थी व ८२ परीक्षा केंद्र आहेत. उस्मानाबाद जिलह्यात १७ हजार २९५ विद्यार्थी व ३७ परीक्षा केंद्र आहेत. नांदेड जिलह्यात ३५ हजार ५३८ परीक्षार्थी व ७६ परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा  कॉपीमूक्त व्हाव्यात यासाठी परीक्षा मंडळाने विशेष लक्ष पुरवले आहे. त्यासाठी भरारी पथके, बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षामंडळ शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद आदिंची पथके रहाणार आहेत. 

संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष रहाणार असून आवशकता भासल्यास चित्रीकरणही करण्यात येणार आहे. सर्व केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त रहाणार आहे. परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय परीक्षागृहात पुरेसा प्रकाश व हवा रहावी याकडेही लक्ष पुरवण्यात आहे.