होमपेज › Marathwada › पोरीच भारी

जिल्ह्याचा निकाल ८९.९० टक्के 

Published On: May 31 2018 1:40AM | Last Updated: May 30 2018 10:33PMपरभणी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर केला. यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. शिक्षण मंडळाच्या वतीने ऑनलाइन परीक्षेच्या निकालाची विभागवार माहिती देण्यात आली. त्यानुसार बारावीच्या परीक्षेत एकूण 89.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या 87.97 टक्के तर मुलींची संख्या 92.94 टक्के इतकी आहे.  जिल्ह्यातून बारावी परीक्षेस एकूण 22 हजार 664 विद्यार्थी बसले होते. यापैकी 20 हजार 306 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 12 हजार 165 मुले तर 8 हजार 141 मुलींचा समावेश आहे. 

बारावीचा निकाल बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून परीक्षाथीर्र्ंना ऑनलाइन पाहता आला. हा निकाल पाहण्यासाठी नेटकॅफेवर एकच गर्दी झाली होती. तसेच प्रत्येकाकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल आल्याने अनेकांनी आपला निकाल मोबाइलवर पाहिला. निकाल पाहिल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

निकालात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला

औरंगाबाद विभागातील इतर जिल्ह्यांच्या निकालावर मात करीत परभणीने या विभागात निकालामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामध्ये परभणी-89.90, औरंगाबाद-89.15, बीड-89.08, जालना-87.45, हिंगोली-86.40 टक्के असा निकाल लागला आहे. यात औरंगाबाद विभागात परभणीने बारावीच्या निकालात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

असा आहे शाखानिहाय निकाल

जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यात तिन्ही शाखांमधून मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये विज्ञान-94.67 टक्के, कला-84.36 टक्के, वाणिज्य-91.93 टक्के, एचएससी-व्होकेशनल- 84.55 टक्के निकाल लागला आहे. 

जिल्ह्यांचा निकाल असा

परभणी-93.04 (मुले-91.91 तर मुली-94.88), पूर्णा-90.23 (मुले-86.88 तर मुली-94.32), गंगाखेड-88.91 (मुले-86.70 तर मुली-92.43), पालम-82.77 (मुले-81.82 तर मुली-84.67), सोनपेठ-88.82 (मुले-87.04 तर मुली-91.44), जिंतूर - 92.03 (मुले-90.40 तर मुली-94.66), पाथरी-90.12 (मुले-88.62 तर मुली-91.93), मानवत-72.51 (मुले-68.29 तर मुली-80.99), सेलू-93.90 (मुले-92.57 तर मुली-95.73) असा निकाल जाहीर झाला आहे.