Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Marathwada › ऑनलाइन बदल्या, हा क्रांतीकारी निर्णय : मुंडे

ऑनलाइन बदल्या, हा क्रांतीकारी निर्णय : मुंडे

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 24 2018 10:45PMबीड : प्रतिनिधी

शिक्षकांच्या ऑनलाइन व पारदर्शक बदल्या करण्याचा क्रांतीकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. हा पारदर्शी निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा शिक्षक संघटनांच्या वतीने रविवारी बीडमध्ये सत्कार करण्यात आला, यावेळीत्या बोलत होत्या. 

यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आर. टी देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, माजी आ. बदामराव पंडित, आदिनाथ नवले पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के आदींची उपस्थित होती.