होमपेज › Marathwada › ‘गोपीनाथ गडावर’ विविध भागातून ‘संघर्षज्योत’ दाखल

‘गोपीनाथ गडावर’ विविध भागातून ‘संघर्षज्योत’ दाखल

Published On: Dec 12 2017 8:06AM | Last Updated: Dec 12 2017 8:06AM

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

‘गोपीनाथ गडावर’ विविध भागातून संघर्ष ज्योत घेवून कार्यकर्ते दाखल झाले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंडेप्रेमींचे मध्यरात्रीपासून आगमन सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्यातून निघालेली पायी 'संघर्षज्योत' घेऊन युवकांचा एक जथ्था  गोपीनाथ गडावर'  दाखल झाला या वेळी ना. पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. 

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याची  संघर्षज्योत मध्यरात्री  परळी शहरात दाखल झाली. या संघर्षज्योतीचे हे चौथे वर्ष आहे. हे तरुण दरवर्षी संघर्षज्योत घेऊन पायी माण ते  गोपीनाथ गड असा प्रवास करत येतात. या संघर्षज्योतीचे ना. पंकजा मुंडे यांनी परळी येथे स्वागत केले. त्यानंतर युवकांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. त्यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला अभिषेक घालून आणलेला प्रसादाचे वाटप यावेळी केले. संघर्षज्योतीचे आयोजक डॉ. राजेंद्र खाडे व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.