Wed, Jul 17, 2019 18:28होमपेज › Marathwada › गोपीनाथ गड सामाजिक उत्थानाचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न

गोपीनाथ गड सामाजिक उत्थानाचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:27PMपरळी : प्रतिनिधी

गोपीनाथ गड हे सामाजिक उत्थानाचे केंद्र बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहील. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी दिलेला वसा आणि वारसा आपण आयुष्यभर जपणार, त्यांच्या शिकवणुकीतून वंचित, उपेक्षितांसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. परळी येथील गोपीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात त्या रविवारी बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे यांचे चतुर्थ पुण्यस्मरण रविवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले, मंत्री प्रा. राम शिंदे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासह खासदार, आमदार व राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांचे चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त रविवारी  गोपीनाथ गड येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सामाजिक उत्थान दिन’ समारंभ पार पडला. छत्रपती खा. उदयनराजे भोसले, छत्रपती खा. संभाजीराजे भोसले, मंत्री प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विजय देशमुख, दिलीप कांबळे, पाशा पटेल, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. मोनिका राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. बाबूराव पाचरने, आ. तानाजी मुटकुळे, आ. सुधाकर भालेराव, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, प्रवीण घुगे, विजय पुराणिक, माजी मंत्री सुरेश धस, माजी आ. केशवराव आंधळे, माजी आ. विजय गव्हाणे, प्रकाश महाजन, अशोक सामत, प्रताप पाटील चिखलीकर, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, आदित्य सारडा, भागवत कराड, भाऊराव देशमुख, गणेश हाके, रत्नाकर गुट्टे, सहाल चाउस, स्वरूपसिंह हजारी, राधाबाई सानप महाराज, नाना नवले आदींसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी तुळशीवृंदावन व स्मृतिचिन्ह  देऊन केले. कार्यक्रमास प्रज्ञा मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे, डॉ. अमित पालवे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे आदी मुंडे कुटुंबीय उपस्थित होते. 

 आपल्या भावना व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष करीत वंचित, उपेक्षितांसाठी काम केले. त्यांचा हा संघर्षाचा वसा आणि वारसा आपण आयुष्यभर जपणार आहोत. शेवटच्या श्‍वासापर्यंत जन सामान्यांच्या सेवेला समर्पण देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. वंचित, उपेक्षित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आवाज बनून काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आ. आर. टी. देशमुख यांनी केले.