Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या : आ. फड

मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या : आ. फड

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:41AMपाथरी : प्रतिनिधी

मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे व आंदोलनादरम्यान मराठा युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ परत घेण्यात यावेत, अशी मागणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन फड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी आदी ठिकाणी मराठा युवकांनी आंदोलने केली आहेत. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे शासनाने कायदेशीर बाबींची पूर्तता करून तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आंदोलनादरम्यान मराठा युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार मोहन फड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, दत्तात्रय जाधव, अजितराव देशमुख, केशवराव बागल, अशोक नखाते उपस्थित होते.