Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Marathwada › शासन निर्णय विरोधात घंटानाद

शासन निर्णय विरोधात घंटानाद

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 08 2018 2:02AMपरभणी : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दि.31 ऑक्टोबर 2005 रोजी व नंतर नियुक्त होणार्‍या कर्मचार्‍यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम (निवृत्तीवेतन) 1982 व 1984 (अंशराशिकरण)  या अंतर्गतच्या पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. सदर योजनेचे स्वरूप व त्याची अंमलबजावणी ही कर्मचार्‍यांचे भविष्य अंधकारात टाकणारी असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी 7 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आले.

नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात कर्मचार्‍यासह संघटनेच्या वतीने मुंडण आक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री यांनी सदर कर्मचार्‍यांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ तत्काळ देऊ व सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचाही विचार करू असे आश्वासन दिले होते. पण या आश्‍वासनाला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी त्याबाबत कोणताही शासन निर्णय घेण्यात आला नाही. दि.16 मार्च 2016 च्या मुंबई येथील धरणे आंदोलनात स्वतः राज्य वित्तमंत्री यांनी येऊन मृत कर्मचार्‍यांना कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यू व सेवा उपदान  लागू करण्याचे जाहीर केले.

सतत आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही ठोस पावले जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत उचलली गेली नाहीत. त्यामुळे आता घंटानाद आंदोलन करून आम्ही शासनाला आपण दिलेल्या आश्वासनाची व आमच्या असंतोषाची जाणीव करून देत आहोत अशी माहिती जिल्हाध्यक्ष डी.व्ही.राजे यांनी दिली.आंदोलनात जिल्हाध्यक्ष डी.व्ही.राजे, सरचिटणीस सुशील वाघमोडे, उपाध्यक्ष रवी लोहट, कार्याध्यक्ष सिध्देश्‍वर मुंंढे, महानगर अध्यक्ष प्रवीण सोनटक्के, राज्य समन्वयक प्रद्युम्न शिंदे, विभागीय अध्यक्ष सिकंदर पाचमासे आदींचा सहभाग होता.

Tags : Marathwada, Ghantanad, against,  government