Wed, Nov 21, 2018 11:46होमपेज › Marathwada › भव्य पारंपरिक शोभायात्रेने वेधले लक्ष 

भव्य पारंपरिक शोभायात्रेने वेधले लक्ष 

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:42AMगेवराई : प्रतिनिधी 

स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्या वतीने यावर्षी  गेवराई शहरात भव्य राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून राजा शिवछत्रपती या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. सोमवारी गेवराई शहरातून पारंपरिक पद्धतीने भव्य शोभायात्रा काढली. या तीन दिवसीय मेजवणीने गेवराईकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

 स्वाभिमानी युवा ब्रिगेड आयोजित राष्ट्रवादी शिवजन्मोस्तव सोहळ्यात माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रा काढण्यात आली. डॉल्बी डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने काढलेल्या या शोभायात्रेने गेवराईकरांचे लक्ष वेधले. या शोभायात्रेत राष्ट्रवादी शिवजन्मोस्तव सोहळा समितीच्या पदाधिकार्‍यांसह, ढोल पथक, लेझीम पथक, विद्यार्थी, विद्यार्थिंनी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  शोभा यात्रेतील ढोल आणि लेझीम पथकात  महिला आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.  यावेळी पालखीतील शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या शोभा यात्रेतील जिवंत देखावा, घोडे आणि पालखी सोहळा इतिहासाची साक्ष देत होता. गेवराई शहरातील तरुणांसह, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक यांनी मोठा सहभाग नोंदवला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजन पूर्वक शिस्त आणि शांततेत हा सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.