Tue, Jul 16, 2019 00:07होमपेज › Marathwada › जनरेटर निघाले भंगारात, पोस्ट ऑफि स अंधारात

जनरेटर निघाले भंगारात, पोस्ट ऑफि स अंधारात

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 8:13PMमाजलगाव : प्रतिनिधी

येथील पोस्ट ऑफीसमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात. कधी सर्व्हर डाऊन तर कधी वीज गेल्यामुळे येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सध्या या ठिकाणचे जनरेटर दिड वर्षांपूर्वी खराब झाले होते, त्यानंतर आता इन्व्हर्टरच्या बॅटर्‍याही खराब झाल्या आहेत. यामुळे कार्यालयात दिवसाच अंधार होत असून नागरिकांची कामे खोळंबली आहेत.

माजलगाव येथील पोस्ट कार्यालयात विविध कामांसाठी मोठी गर्दी होत असते. नागरिकांची होणारी गर्दी आणि धिम्या गतीने काम करणारी यंत्रणा यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कार्यालयात अखंडीत वीजपुरवठा व्हावा यासाठी शासनाने येथे पाच लाख रुपयांचे जनरेटर दिले होते, परंतु दीड वर्षांपूर्वी हे जनरेटर बंद पडले, त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. यातच आता इन्व्हर्टरच्या बॅटर्‍याही खराब झाल्याने वीज जाताच कार्यालयात अंधार होत आहे. सर्व कामे संगणकावर असल्याने तीही खोळंबून राहत आहेत. परिणामी येणार्‍या नागरिकांनी तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. 

पोस्ट ऑफीसमध्ये स्पीड पोस्ट, मनीआर्डर, रजिस्टरी सह माझी सुकन्या व राष्ट्रीय बचत योजनेच्या कामासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. मात्र वीज नसल्यास त्यांना प्रतीक्षेशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

या ठिकाणी पाच पदे मंजूर असून सध्या तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. पोस्ट मास्तरचेच पद रिक्त असून त्यांचा कार्यभार सहायक पोस्ट अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे. जनरेटर दुरुस्तीसह इन्व्हर्टर बॅटरीची मागणी  अनेक वेळा केली आहे. अद्याप ते दुरुस्त झालेले नाही.  
जितेंद्र सावंत, प्रभारी पोस्ट मास्तर.