Sat, Mar 23, 2019 00:26होमपेज › Marathwada › कोळपिंप्री येथे हवेतून पाणीनिर्मितीचा प्रयोग 

कोळपिंप्री येथे हवेतून पाणीनिर्मितीचा प्रयोग 

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 05 2018 11:41PMधारूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळपिंप्री येथे अमेरिकेतील झीरो मास कंपनीच्या सहाय्याने देशातील पहिला हवा व सौरऊर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. या पासून प्रती दिवशी तीस लिटर पाणी बनवण्यात येणार असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रोजेक्ट बसवण्यात आला या प्रोजेक्टचे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना पिण्यास मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तनमध्ये समावेश असणार्‍या कोळपिंप्री या गावात देशात प्रथमच नाविण्यपूर्ण असा प्रकल्प उभारण्यात आला असून हवे पासून सौर ऊर्जेच्या मदतीने पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेतील  झीरो मास वाटर या कंपनीने हे बसवले आहे.  हे बसवण्यासाठी बेंजामिन हे अमेरीकेतून आले आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी  संदीप यादव, ऋषिकेश महाजन हे आले होते. दोन दिवसांमध्ये ही सर्व मशनरी शाळेवर लावली. विजेचा वापर न करता सौर ऊर्जेच्या साहाय्याने हवेतून पाणीनिर्मीती करण्यात येणार आहे. प्रतीदिवशी तीस लिटर पाणी शुद्ध होणार असून विद्यार्थ्यांसाठी हे पाणी वापरले जाणार आहे. या कंपनीच्या मुंबई ऑफीसवर व त्या नंतर कोळपिंप्री येथेच हा प्रकल्प करण्यात आला आहे. 

अमेरिकेतून नियंत्रण

15 हजार डालर्स खर्च या प्रकल्पाचा असून वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येथे बसवून या गावाने परिवर्तनाचे नवे पाऊल टाकले आहे. या मशीन कशा प्रकारे चालू आहे किंवा दुरुस्ती ऑनलाइन पद्धतीने होणार असून थेट अमेरिकेतील कंपनी कार्यालयातून यांचे निंयत्रण होणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे.

दरम्यान, कोळवाडी शाळेत बसवण्यात आलेल्या या प्रकल्पाची चर्चा जिल्हाभरात होत असून कुतूहलापोटी अनेकांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

 

Tags : kolpimpri, kolpimpri news, air water, Experiment,