Tue, Nov 19, 2019 03:47होमपेज › Marathwada › गंगाखेड न.प.ची फसवणूक

गंगाखेड न.प.ची फसवणूक

Published On: Aug 06 2018 2:01AM | Last Updated: Aug 06 2018 1:59AMगंगाखेड : प्रतिनिधी

नगर परिषदेंतर्गत जनावरांचा दाखला ठेक्याची रक्कम न भरताच नगर परिषद नियम कराराची पायपल्ली करीत ठेकेदाराने चक्क 15 लाख 75 हजारांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर  कारवाई करण्याची मागणी सुभाष शिंदे यांनी करूनही कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये न.प.अतंर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षासाठी जनावरांचा बाजार दाखला हर्रासीचा ठेका हबीबखाँ इनायतुल्लाखाँ यांनी 20 लाख 75 हजारांची बोली लावून घेतला होता. न.प.नियम व करारनामानुसार बोलीमध्ये ठेका घेणार्‍या ठेकेदारांनी बोलीची 25% रक्कम तत्काळ भरून उर्वरित रक्कम ठेका सुरू करण्यापूर्वी भरणे बंधनकारक होते. संबंधित ठेकेदाराने केवळ पाच लाख रुपये भरले होते.

पण न.प.तील काही कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे बोलीची रक्कम पूर्णपणे न भरताच दाखला ठेक्याची वसुली सुरूच ठेवली. न.प.ने उर्वरित रक्कम भरण्यासाठी संबंधित ठेकेदारास वारंवार सूचना व नोटीस दिल्या, पण रक्कम न भरताच नऊ महिने ठेका सुरूच ठेवला. अनेक वेळा नोटीस पाठवूनसुद्धा ठेक्याची उर्वरित रक्कम न भरल्या प्रकरणी न.प.ने मालमत्तेवर बोजा टाकून गुन्हा दाखल करण्याची अंतीम नोटीस पाठवून थकबाकी अदा न केल्याने दि.12 ऑक्टोबर 2015 रोजी दाखला हर्रासी ठेका रद्द करण्यात आला. त्यावेळी न.प.ने दिलेले दाखला पावतीबुक आजपर्यंत हबीबखाँ यांनी न.प.मध्ये जमा केलेच नाही. केवळ पाच लाखांत नऊ महिने ठेका चालवून न.प.चे 15 लाख 75 हजारांचे केलेले नुकसान तत्काळ भरून फसवणूक प्रकरणी कारवाई करण्याची  मागणी सुभाष शिंदे यांनी केली आहे.