Fri, Feb 22, 2019 16:44होमपेज › Marathwada › 17 हजार हेक्टरवरील पिकांस फटका

17 हजार हेक्टरवरील पिकांस फटका

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:39AMगंगाखेड ः प्रतिनिधी

तालुक्यात दोन दिवस फक्त ढगाळ वातावरण होते, पण मंगळवारी दुपारी 3 वाजल्यापासून वातावरणात बदल होऊन चार वाजता मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये रब्बी पिकांना जबर फटका बसला आहे.शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनच ऊन व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात रब्बी हंगामाचे पेरणीक्षेत्र 25 हजार हेक्टर असून यात 9 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे.तर 2 हजार हेक्टरवर गहू 1 हजार हेक्टवर भाजीपाला, टरबूज, खरबूज लावण्यात आले.5 हजार हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी झालेली आहे.

यंदा हरभर्‍याचे क्षेत्र वाढलेले आहे.ज्वारी, गहू, हरभर्‍याचे पीके जोमात आल्याने शेतकरी निवांत होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस व गारपीट जिल्ह्यात झाली असली तरी गंगाखेड तालुका मात्र यातून अलिप्त होता. पण  अचानक मंगळवारी दुपारी तीनपासून आभाळ भरून आले व हवेत गारवा निर्माण झाला व चार वाजता अवकाळी मुसळधार पावसास सुरुवात झाली. यातच गारांचा मारा होत होता. 

तब्बल 25 मिनिटे मुसळधार पाऊस व गारपीट झाली. गंगाखेड, महातपुरी सज्जा, मुळी, नागठणा, झोला, मसला, मरडसगाव, मालेवाडी, पडेगाव, राणीसावरगाव सज्जा, गुंजेगाव, हारगुंळ, केरवाडी, वाघलगावसह अनेक गावांत गारपीट झाली आहे. तहसील प्रशासनाचे दत्तराव बिलापट्टे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांच्याकडून घेत आहे. या अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा शेतकर्‍यांचा डोळ्यांत अश्रू आणले आहेत.