Sun, May 26, 2019 11:45होमपेज › Marathwada › बनावट नोटांचे धागेदोरे ठाण्यापर्यंत 

बनावट नोटांचे धागेदोरे ठाण्यापर्यंत 

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:40AMजालना : प्रतिनिधी

होळी सणानिमित्त करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान 500 रुपयांच्या बनावट नवीन 91 नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. बनावट नोटांचे धागेदोरे ठाण्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिह गौर शहरात होळीनिमित्त गस्त घालत असताना त्यांना एक जण संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे दिसून आले. यावेळी हमीद चौक, पेन्शनपुरा येथून शेख हमीद शेख युसूफ याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 500 रुपयांच्या बनावट 7 नोटा जप्त करण्यात आल्या. त्यानंतर मोहन श्रीकिशन जैस्वाल (रामनगर, ता.जालना) याच्या ताब्यातून 500 रुपयांच्या 84 नोटा जप्त करण्यात आल्या. यावेळी जैस्वाल यास बनावट नोटाबाबत विचारणा केली असता त्याने या नोटा शेख हमीद शेख युसूफ याने व्यवहारात आणण्यासाठी दिल्याची माहिती दिली.

 याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात मोहन जैस्वाल, शेख हमीद शेख युसूफ याच्यासह नोटा देणार्‍या एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करणयात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, सपोनि शेख रज्जाक, तुकाराम राठोड, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, विनोद गडदे, सचिन चौधरी, वैभव खोकले, रंजित वैराळे, महिला कर्मचारी पठाण यांनी केली. अजूनही बनावट नोटा हाती येण्याची शक्यता पेालिस सूत्रांनी वर्तविली आहे.