Thu, Nov 15, 2018 17:58होमपेज › Marathwada › रोज 6 हजार रुपयांच्या थंड पाण्याचे मोफत वाटप

रोज 6 हजार रुपयांच्या थंड पाण्याचे मोफत वाटप

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:21PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

स्वतःच्या कमाईतून अंबाजोगाईतील रिक्षाचालक स्वाराती रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना दररोज सहा हजार रुपयांचे थंड पाणी मोफत देत आहेत.

गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आजूबाजूच्या गावातून उपचारासाठी  हजारो रुग्ण आणि त्यांच्यासोबत नातेवाईक येतात. सध्या उन्हाची तीव्रता  वाढली आहे. पाराही 40 च्या वर चढलेला असल्यामुळे  अंगाची लाही-लाही होते. अशा परिस्थितीत  रुग्णांचे आणि नातेवाईकांचे पाण्याअभावी  हाल होतात. 

बाटलीबंद थंड पाणी किती विकत घ्यायचे हा देखील त्यांच्यासमोर प्रश्‍न असतो. त्यांची  अडचण रुग्णालयाबाहेर रिक्षा चालवून गुजरान करणार्‍या रिक्षा चालकांच्या लक्षात  आली. ऑटो युनियनचे अध्यक्ष मुन्नाभाई, उपाध्यक्ष नईम पठाण, सल्लागार माजेद अली, बरकत मिरखॉ, हबीब भय्या, आमेर शेख, किरण नाईकवाडे, अमोल पवार, शफिक मिरखॉ, सचिन पौळे यांनी सामाजिक भान राखून पदरमोड करून पैसे जमा केले आणि रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जारच्या थंडगार पाण्याची मोफत पाणपोई सुरू केली.