Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Marathwada › मोफत गणवेशासाठी पाच कोटी साडेअकरा लाख प्राप्‍त

मोफत गणवेशासाठी पाच कोटी साडेअकरा लाख प्राप्‍त

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:35PMसोनपेठ : राधेश्याम वर्मा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या वतीने मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. परंतु शाळा सुरू होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही गणवेशाचे वाटप करण्यात आलेले नाही. दरम्यान, परभणी जिल्ह्यासाठी तालुकानिहाय 5 कोटी 11 लक्ष 57 हजार 800  रुपये जमा झाले आहेत.

गणवेश वाटप न झाल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागत असल्याचे दिसत आहे. सोनपेठ तालुक्यात गणवेशपात्र विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार 396 असून यासाठी 32 लक्ष 37 हजार 600  रुपये जमा झाले आहे. तसेच वंचित असणार्‍या विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी  शिक्षण प्रेमी व पालक वर्गातून होत आहे.

वरिष्ठ लेखा सहायकाअभावी रखडली गणवेशाची रक्कम : सोनपेठ तालुक्यात सहा केंद्रांतर्गत असणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात. येथील गटसाधन केंद्राचे वरिष्ठ लेखा सहायक यांची बदली झालेली आहे. यामुळे सातत्याने पत्र व्यवहार करून दि.19 रोजी रिक्त जागेवर नवीन लेखा सहायक रुजू झाले असून त्यांना सर्व बाबी लक्षात घेण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे विद्यार्थी अजून किती दिवस गणवेशापासून वंचित राहतील? हे सांगता येत नाही. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांची संख्या जि.प.प्राथमिक शाळांची संख्या 85 तर जि. प. माध्यमिक शाळांची संख्या 2 आहे. या संपूर्ण शाळेत शिक्षण घेणा-यांची संख्या अंदाजे 10 हजारांच्या जवळपास आहे.