Fri, Mar 22, 2019 06:13
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › वीज कोसळून चार जखमी 

वीज कोसळून चार जखमी 

Published On: Apr 08 2018 8:39PM | Last Updated: Apr 08 2018 8:39PMअंबाजोगाई :  प्रतिनिधी 

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथे वीज कोसळून एकाच कुटुंबातील तिघे व अन्य एक जण जखमी झाल्याची घटना आज (रविवारी दि.7) घडली. फुलाबाई भागवत गोमदे (55), अभिजित भागवत गोमदे(29), अशोक दिलीप माने( 26) व भागवत सिताराम गोमदे ( 62 )  सर्व रा.डिघोळअंबा अशी जखमींची नावे आहेत. 

जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातल्या डिघोळअंबा येथे गोमदे यांच्या  शेतात सोयाबीनचे  खळे सुरू होते .अचानक वारा पाऊस आल्याने  सर्वजण कडूलिंबाच्या  झाडाखाली थांबले. अचानक मोठा आवाज होऊन वीज कोसळली .यामध्ये अभिजित  भागवत गोमदे हे  गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य तिघांचे  कपडे जळून हात, पाय गंभीर भाजल्याचे प्रत्यक्षदर्शी खंडू जगदेव यांनी सांगितले. तसेच दहा मिनिटे नेमके काय झाले हे कळलेच नाही. त्यानंतर जखमींना ऑटोमधून अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी जगदेव म्हणाले.