होमपेज › Marathwada › बीड :  ऑटो आणि ट्रॅव्हल्स अपघातात चार ठार 

बीड :  ऑटो आणि ट्रॅव्हल्स अपघातात चार ठार 

Published On: Apr 06 2018 10:52AM | Last Updated: Apr 06 2018 10:49AMबीड : प्रतिनिधी

परळीरोडवर ॲपे रिक्षा आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. ॲपे रिक्षा पांगरीहुन परळीकडे जात होती. ट्रॅव्हल्सची धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून एक गंभीर जखमी आहे. गुरूवारी (५ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

या आपघातात मौजे पांगरी या एकाच गावातील बन्सी(बाळु)रामभाऊ पाचांगे (वय.२४), श्रावण नागोराव पाचांगे (वय.२०), सुशिल उत्तम पाचांगे(२१) प्रकाश विलासख पंडित(२१)याचा मृत्यू झाला. तर गंगाधर अशोक पाचांगे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पांगरी (ता:परळी) गावावर शोककळा पसरली आहे.