Tue, Nov 13, 2018 01:28होमपेज › Marathwada › जिल्हाभरातील सहाशे गावांमध्ये अन्न दिन

जिल्हाभरातील सहाशे गावांमध्ये अन्न दिन

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 9:55PMबीड : प्रतिनिधी 

रेशनवरील शिधापत्रिकाधारक नागरिकांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी महिन्याच्या सात तारखेला अन्न दिन साजरा करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील 636 गावांमध्ये या महिन्यात अन्नदिन साजरा करण्यात आला. तर, अन्न सप्ताहात आपापर्यंत 800 गावांना धान्य पोहच करण्यात आले. शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

सरकारकडून दिवसेंदिवस धान्य वितरणामध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता आणली जात आहे. अन्नधान्याविना उपासमार होऊ नये, गरजू कुटुंबांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी आता दर महिन्याच्या सात तारखेला अन्न दिन साजरा करण्यात येत आहे. तर, सात तारखेपासून 14 तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

या अगोदर रेशन दुकानदारांकडून पैसे भरून माल देण्याची प्रक्रिया महिन्याच्या 25 तारखेपर्यंत चालत होती. यामुळे कार्डधारकांना धान्य कधी येते, याची वाट पहावी, लागत होती. आता मात्र पहिल्याच आठवड्यात रेशनवर धान्य येत असल्याने धान्य वेळेवर मिळू लागले आहे.