Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Marathwada › अपुर्‍या कर्मचार्‍यांवर चालतो अग्निशमनचा कारभार

अपुर्‍या कर्मचार्‍यांवर चालतो अग्निशमनचा कारभार

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 29 2018 10:50PMबीड : उदय नागरगोजे

आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या बीडच्या अग्निशामक दलालाच आता मदतीची गरज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अपुर्‍या कर्मचार्‍यांवरच या विभागाचा कारभार चालतोय. प्रशिक्षीत आणि पुरेसे मनुष्यबळ मिळावे यासाठी तीन वेळेस निविदा काढूनही पात्र संस्था मिळत नसल्याने ही परिस्थिती कायम आहे. एखादी दुर्घटना घडल्यास आहे त्या कर्मचार्‍यांनाच वेळ निभावून न्यावी लागते.

बीड नगर परिषदेच्या अग्नीशामन विभागाला स्थापनेपासूनच अपुर्‍या कर्मचार्‍यांचे ग्रहण आहे. कधी प्रभारीवर तर कधी संस्थेने पुरवठा केलेल्या केलेल्या कर्मचार्‍यांवर काम भागवावे लागतेे. बीडसारख्या वेगाने विस्तारणार्‍या शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सक्षम यंत्रणा कार्यान्वीत असायला हवी, परंतु अग्नीशमन सारख्या महत्त्वाच्या विभागाकडे दुर्लक्ष होतांना दिसते. आता नव्याने काढण्यात आलेल्या निविदेत 16 फायरमन आणि 8 चालक-ऑपरेटरची मागणी करण्यात आलेली आहे. यापूर्वी तिन्ही वेळेस निकषांमध्ये बसणारी निविदाच न आल्याने चौथ्यांदा निविदा काढावी लागली. आता तरी पात्र संस्था मिळते की नाही, असा प्रश्‍न कायम आहे. वरिष्ठांनी ही समस्या त्वरीत दूर करण्याची आवश्यकता आहे.